मा. कुलगुरू, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी २१ जून २०२५ रोजी योगा दिवस साजरा केला.
'श्री म्हाइंभट्ट ग्रंथालय' सुरू करण्यात आले.
विद्यापीठाचे बोधचिन्ह, ब्रीदवाक्य व झेंडा तयार करण्यात आला आहे.
०६, ०७ व ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी परिषद आयोजित करण्यात आली. ११ अभिजात भाषांतील ५५ तज्ज्ञ सहभागी झाले.
उद्घाटक: मा. श्री चंद्रकांतदादा पाटील व मा. उदय सामंत उपस्थित होते.
'भाषिणी' ॲपच्या माध्यमातून बहुभाषिक संवाद साधण्यात आला.
‘बंकिमचंद्रांचे वंदेमातरम विचार’ या विषयावर डॉ. हरिदास आखरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कुलगुरूंनी संविधानाचे महत्त्व सांगून शपथ देण्यात आली.
बोलींचा जागर, जागतिक कामगार दिन, चक्रधर स्वामी अवतार दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन, वीरबाल दिन, स्वामी विवेकानंद जयंती, जिजाऊ जयंती, शिवाजी महाराज जयंती, नशामुक्त अभियान इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.